You are currently viewing कुडाळात दुकाने बंद करण्याची सक्ती नको…

कुडाळात दुकाने बंद करण्याची सक्ती नको…

नगराध्यक्षांची मागणी; सहकार्य करण्याचे मुख्याधिकाऱ्यांना आवाहन…

कुडाळ

शहरातील व्यापारी वर्गावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात येऊन नये,त्यासाठी आवश्यक असलेल्या नियम व अटींचे आम्ही तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करू,अशी मागणी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी मुख्याधिका-यांकडे केली आहे.याबाबत त्यांनी आज निवेदन दिले.
यावेळी विनायक राणे संध्या तेरसे, सायली मांजरेकर, सुनील बांदेकर, राकेश कांदे, साक्षी सावंत, अनंत धडाम, अश्विनी गावडे, शरद गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ही वस्तुस्थिती असली तरी वारंवार लाॅकडाऊन दुकाने बंद करण्यात येत असल्यामुळे सर्वसामान्य व्यापाऱ्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या नियमांचे आम्ही पालन करू, त्यासाठी तुम्ही सहकार्य करा,सक्ती करू नका असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − five =