कणकवली बस स्थानकात नगर पंचायत कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला…

कणकवली बस स्थानकात नगर पंचायत कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला…

कणकवली

येथील बस स्थानकात कणकवली नगर पंचायतीचा कर्मचारी मृतावस्थेत आढळून आला. उत्तम धाकु मुणगेकर (वय ५० रा. श्रावण) असे त्याचे नाव आहे.
आज सकाळी बस स्थानकातील तिकीट बुकिंग विभागा समोरील बाकड्यावर मुणगेकर याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा