उदय सामंत आज सिंधुदुर्ग  जिल्ह्यात; असा असेल दौरा

उदय सामंत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात; असा असेल दौरा

सिंधुदुर्गनगरी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आज (6) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 6 रोजी दुपारी 1.50 वाजता हेलिकॉप्टरने पोलिस परेड ग्राऊंड, ओरोस – सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने जिल्हा शासकीय रुग्णालय, ओरोस – सिंधुदुर्गकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी भेट देतील. दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयत पोहोचतील.

सिंधुदुर्ग येथे जिल्ह्यातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा घेवून कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर कडक निर्बंध संदर्भात आढावा बैठक.

दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे राखीव, दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषद, सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथून मोटारीने पोलिस परेड ग्राऊंड, ओरोस-सिंधुदुर्गकडे प्रयाण, सायंकाळी 4.15 वाजता पोलिस परेड ग्राऊंड, ओरोस-सिंधुदुर्ग येथे आगमन व हेलिकॉप्टरने पुण्याकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा