मालवण येथे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते विविध विकास कामांची भूमिपूजने

मालवण येथे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते विविध विकास कामांची भूमिपूजने

नांदरुख, धामापूर, साळेल, पेंडूर गावातील कामांचा शुभारंभ

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून वेगवेगळ्या योजनांमधून मालवण तालुक्यातील नांदरुख, धामापूर, साळेल, पेंडूर या गावातील विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांचे भूमिपूजन आज आ. वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी आ.वैभव नाईक यांनी इतर प्रलंबित विकास कामांचा आढावा ग्रामस्थांकडून घेत मंजूर करण्यात आलेली विकास कामे दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या.

यामध्ये साळेल कुळकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, साळेल नांगरभाट रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, धामापूर गोड्याचीवाडी विंधन विहीर बांधणे, धामापूर मोगरणे येथे साकव बांधणे, नांदरुख प्राथमिक शाळा ते गिरोबा मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, पेंडूर मोगरणे गावडेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी नांदरुख येथे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाळ महभोज, बाबू टेंबुलकर, सरपंच दिनेश चव्हाण, उपसरपंच सुहास राणे, हरी लाड, गजानन चव्हाण, सुनील चव्हाण, प्रसाद लाड, विशाल धुरी,
साळेल येथे सरपंच साक्षी यादव, उपसरपंच रवींद्र साळकर, रश्मी पोकळे, गणपत पडवळ, राम धनावडे, महेंद्र गावडे, भानजी गावडे, सर्वेक्षरी गावडे, साबाजी गावडे, धामापूर येथे अनिल ठोंबरे, बाबा गोडे, बाबा आंगणे, सुधीर मडये,बाबल साळसकर,अर्जुन पोफळे, विलास पोफळे, सुरेश पोफळे, सुंदर पोफळे
पेंडूर येथे बाबू कांबळी, रामू सावंत, सरपंच सुनीता मोरजकर, दर्शन म्हाडगूत, राघो गावडे, पपी सावंत, रवी गावडे, अनंत गावडे, उल्हास गावडे, अजित नाईक. आदिंसह ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा