You are currently viewing आंतरजातीय विवाह; अनुदानाचा मार्ग मोकळा

आंतरजातीय विवाह; अनुदानाचा मार्ग मोकळा

ओरोस (सिंधुदुर्ग)

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला 60 लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे परिपूर्ण प्रस्ताव सादर करून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 52 लाभार्थ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

समाजामधील अस्पृश्‍यता नष्ट व्हावी, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाने आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जातीचा उंबरठा ओलांडणाऱ्या जोडप्यांना 50 हजार रुपये तर 2010 पूर्वी विवाह झाला असेल आणि त्या जोडप्याने या योजनेचा अद्याप लाभ घेतलेला नसल्यास त्या जोडप्याला 15 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाते.

यातील 50 टक्के रक्कम केंद्र व उर्वरित 50 टक्के रक्कम राज्य करून अनुदान स्वरूपात दिली जाते. या योजनेचा जिल्ह्यातील अनेक जोडपी लाभ घेताना दिसत आहेत.

अशी मिळते मदत

जातीचा उंबरठा ओलांडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना 1 फेब्रुवारी 2010 पूर्वी विवाह झाला असल्यास 15 हजार रुपये तर त्यांनतर विवाह झाला असल्यास शासनाकडून 25 हजार रुपये एवढे प्रोत्साहन अनुदान दिले जाते.

 

यांना मिळते मदत

या योजनेत अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्‍या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती सवर्ण म्हणजे हिंदू, जैन, लिंगायत, शीख या धर्मातील असेल तर त्या विवाहास आंतरजातीय विवाह म्हणून संबोधण्यात येत होते आणि त्यांना लाभ दिला जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × three =