You are currently viewing शरद पवार गटाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर

शरद पवार गटाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोल्हे, सुप्रिया सुळेंसह निलेश लंकेंच्या नावाची घोषणा

 

मुंबई :

 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये बारामती आणि शिरुरसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि शिरुरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. निलेश लंके अजित पवार गटातून शरद पवारांकडे स्वगृही परतले असून, शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिला. मुंबईत शरद पवार गटाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये एकूण ५ उमेदवारांचा समावेश करण्यात आला. वर्धा येथून अमर काळे, दिंडोरीमधून भास्कर भगरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे आणि अहमदनगरमधून निलेश लंके यांच्या नावाची घोषणा केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा