सावंतवाडी शहरात कोरोना प्रतिबंधक उपक्रम..

सावंतवाडी शहरात कोरोना प्रतिबंधक उपक्रम..

*संजू विरनोडकर टिंमचे कार्य.*

सावंतवाडी :

शहरात अचानक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ माजली व नागरिकांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले सबनीस वाडा भागात मृत पावलेल्या व्यक्तीमुळे व कोरोना बाधित आढळल्यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या विनंतीवरून भराडी पांदन या ठिकाणी कोरोना बाधितांच्या घरात व या पूर्ण परिसरातील घरोघरी कोरोना प्रतिबंधक फवारणी करण्यात आली तसेच या भागात ओम गणेश या इमारतीत सहा रुग्ण आढळल्यामुळे या संपूर्ण इमारतीच्या चारही विंग मध्ये व परिसरात आजूबाजूच्या इमारतींवर रस्त्यांवर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली या उपक्रमात संतोष तळवणेकर, तुषार बांदेकर, सागर मळगावकर, आकाशमराठे, श्रीकांत कुडपे, प्रशांत मडगावकर, विश्वनाथ पास्ते व नागरिकानी आणि सहभाग घेतला तर आकेरी, कुडाळ शहर येथेदेखील कोरोना बाधितांच्या घरात निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी अचानक बोलवणे न करता एकदिवस अगोदर नागरिकांनी कळवावे अशी विनंती या टिंममार्फत करण्यात आली.

संपर्क :9665662662 / 9403369103

प्रतिक्रिया व्यक्त करा