सावंतवाडी तालुक्यातील मंगल कार्यालय मालक संघटनेची उद्या सभा…

सावंतवाडी तालुक्यातील मंगल कार्यालय मालक संघटनेची उद्या सभा…

सावंतवाडी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालयांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर पुढील भूमिका ठरविण्यासाठी उदया सायंकाळी पाच वाजता माजगाव येथील डी.के.सावंत सभागृहात तालुक्यातील मंगल कार्यालय मालक संघटनेची सभा आयोजित करण्यात आली आहे.तरी सर्व मंगल कार्यालय मालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान सद्यस्थितीत मंगल कार्यालयांवर आलेल्या अडचणीवर विचार विनिमय करून मार्ग काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.त्यामुळे सर्व मालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डी. के.सावंत, आना गांवकर, अमित अरवारी,  बाळू कशाळीकर आदींनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा