You are currently viewing बांदा शहरातील नुकसानग्रस्त घरांची जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली पाहणी

बांदा शहरातील नुकसानग्रस्त घरांची जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली पाहणी

बांदा

अतिवृष्टीमुळे बांद्यात झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत व सावंतवाडी तालुका राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी व त्यांच्या टीमने बांदा येथील पूर परिस्थितीची पाहणी केली. तसेच काही घरांचे नुकसान झाले होते अशा काही जणांना सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी च्या वतीने प्राथमिक स्वरुपात ताडपत्री चे वाटप करण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, उद्योग व व्यापार विभाग कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष प्रतिकार राजगुरू, उद्योग व्यापार जिल्हा सरचिटणीस नेहा शेख, तालुका सदस्य संतोष जोईल, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ युवक अध्यक्ष शैलेश लाड, संदीप जाधव, असलम खतीब, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच भांड्यातील ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + fourteen =