You are currently viewing खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत युतीचीच सत्ता येणार –  आ.नितेश राणे

खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत युतीचीच सत्ता येणार –  आ.नितेश राणे

सावंतवाडी

खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडीत भाजप आणि शिंदे गटाची युती पाहण्यास मिळाली.
यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासह दीपक केसरकर समर्थक कार्यकर्त्यांनी श्री देव पाटेकरांचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी काही झाले तरी सावंतवाडी खरेदी- विक्री संघावर युतीचीच सत्ता येईल असा दावा श्री. राणे यांनी केला.

श्री. राणे व केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येथे प्रचार करण्यात येणार होता. परंतु केसरकर काही घरगुती अडचणींमुळे त्याठिकाणी येवू शकले नाहीत. त्यामुळे सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी श्री पाटेकराचे दर्शन घेवून प्रचाराला सुरुवात केली.
यावेळी त्या ठिकाणी झालेल्या बैठकीत राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, आनारोजीन लोबो, महेश सारंग, अशोक दळवी आदींनी उपस्थित उमेदवार व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, प्रमोद कामत, गुरूनाथ पेडणेकर, प्रमोद सावंत, परिमल नाईक, दत्ताराम कोळमेकर, नारायण हीराप, चद्रकांत जाधव, एकनाथ नाडकर्णी, अजय सावंत, अजय गोंदावळे, प्रमोद गावडे, अमित परब, महेश पांचाळ, संतोष नानचे, गजानन गावडे आदी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा