You are currently viewing नगरसेवक ॲड. परिमल नाईक यांच्या तर्फे पत्रकारांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

नगरसेवक ॲड. परिमल नाईक यांच्या तर्फे पत्रकारांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून व सावंतवाडी नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती ॲड. परीमल नाईक यांच्या तर्फे सावंतवाडीतील पत्रकार मित्रांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तालुका पत्रकार संघातर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, ॲड. परिमल नाईक, सचिव प्रसन्न राणे, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत, माजी सचिव अमोल टेमकर, सदस्य सचिन रेडकर, रुपेश हिराप, दीपक गावकर, निखिल माळकर, शैलेश मयेकर, रोहन गावडे आदींसह पत्रकार उपस्थित होते.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार मित्र स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत असतात. त्यामुळे या कोरोना योद्ध्यांना पाठबळ देणे प्रत्येकाचे सामाजिक कर्तव्य आहे. याच सामाजिक जाणिवेतून हा कार्यक्रम आयोजित केल्याचे यावेळी माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक ॲड. परीमल नाईक यांनी स्पष्ट केले.

यापूर्वीही मागील आठवड्यात तालुका पत्रकार संघाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४४ युवकांनी रक्तदान शिबीरात रक्तदान केले होते. या नंतरही असेच उपक्रम राबविले जातील, असे यावेळी तालुकाध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांनी सष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =