You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात अविष्कार संशोधन संमेलनाचे आयोजन

वैभववाडी महाविद्यालयात अविष्कार संशोधन संमेलनाचे आयोजन

वैभववाडी महाविद्यालयात अविष्कार संशोधन संमेलनाचे आयोजन

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात सोमवार दि. ३० नोव्हेंबर रोजी मुंबई विद्यापीठाचे २१ वे अविष्कार संशोधन संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात येणारे २१ वे अविष्कार संशोधन संमेलन २०२६-२७ हे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२६ रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक श्री. सुनील पाटील, मुंबई विद्यापीठाच्या OSD डॉ. मीनाक्षी गुरव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, नाविन्यपूर्ण कल्पना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. या संमेलनामध्ये विविध विषयांतील विद्यार्थी संशोधक आपल्या संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या संशोधन कल्पना मांडण्यासाठी, संशोधनाचे मूल्यमापन करून घेण्यासाठी तसेच संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी वैभववाडी महाविद्यालयाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक महाविद्यालयांनी यामध्ये सहभागी होऊन हे अविष्कार संशोधन संमेलन यशस्वी करण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा