You are currently viewing दोडामार्ग – हेवाळेची अनुजा देसाई देशात सातवी

दोडामार्ग – हेवाळेची अनुजा देसाई देशात सातवी

दोडामार्ग नगर पंचायत तर्फे सत्कार

दोडामार्ग – हेवाळे गावातील शेतकरी कुटुंबातील मुलगी अनुजा मनोहर देसाई ही नवोदय विद्यालयाच्यावतीने घेतलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत भारतात सातवी आली. आयएसआय अधिकारी बनण्याचे तिचे स्वप्न आहे. तिच्या या ध्येयाची दखल घेऊन कसई दोडामार्ग नगरपंचायतचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांच्या तिचा हस्ते सत्कार करण्यात आला. व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

हेवाळे गावातील शेतकरी मनोहर शिवाजी देसाई, सौ. मंजिरी देसाई यांची कन्या कु. अनुजा मनोहर देसाई ही नवोदय विद्यालय सांगेली येथे आता अकरावीत शिकत आहे. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण,  उपनगराध्यक्ष देवीदास गवस बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, शिक्षण व आरोग्य सभापती सौ. गौरी पार्सेकर, महिला व बाल कल्याण सभापती सौ. ज्योती जाधव, नगरसेविका क्रांती जाधव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा