You are currently viewing 13 नोव्हेंबर रोजी श्री कुडाळेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव

13 नोव्हेंबर रोजी श्री कुडाळेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव

कुडाळ :

 

श्री देव कुडाळेश्वर देवतेची वार्षिक जत्रा रविवार दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. तरी सर्व भक्तांनी या वार्षिक जत्रोत्सवामध्ये सहभागी व्हावे, अशी विनंती मंडळातर्फे  करण्यात आली आहे. रविवार दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी संपूर्ण दिवस रात्री श्री देव कुडाळेश्वर महाराजांना नारळ केळी ठेवणे, नवस फेडणे, नवीन नवस करणे चालू राहील. जत्रोत्सवानिमित्त रात्री 10 वाजता पुराण वाचन होईल. रात्री 11 वाजता श्री देव कुडाळेश्वर महाराजांची ढोल ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक होईल आणि त्यानंतर रात्री 12.30 वाजता वालावलकर दशावतारी नाटक मंडळींचे पौराणीक नाटक व दहीकाला होऊन जत्रेची सांगता होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =