You are currently viewing कणकवली शहरातील विकासकामांसाठी ३ कोटी १२ लाखांचा निधी मंजूर…

कणकवली शहरातील विकासकामांसाठी ३ कोटी १२ लाखांचा निधी मंजूर…

बंडू हर्णे, समीर नलावडे यांची माहिती; रिंगरोडच्या टप्प्यातील कामे पूर्ण होणार…

कणकवली

शहरातील विकास कामांसाठी राज्‍य शासनाने २ कोटी १२ लाख रूपयांचा निधी दिला आहे. यातून रिंगरोड व इतर विकास कामे होतील. आमच्या सत्तेची कारकिर्द संपली तरी आमदार नीतेश राणे यांनी कणकवली शहराच्या विकासासाठी निधीचा ओघ सुरूच ठेवला आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिली.
कणकवली येथील समीर नलावडे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी नगरसेवक माजी नगरसेवक अभिजित हर्णे, किशोर राणे आदी उपस्थित होते.

श्री.हर्णे म्‍हणाले, कणकवली शहरातील रिंगरोड आणि इतर विकास कामे अपूर्ण राहिली होती. त्‍यासाठी ३ कोटी रूपयांचा निधी आवश्‍यक असल्‍याची बाब आम्‍ही आमदार नीतेश राणे यांना सांगितली. त्‍यानंतर श्री.राणे यांनी राज्‍य शासनाच्या माध्यमातून ३ कोटी १२ लाख रूपयांचा विकास निधी उपलब्‍ध करून दिला आहे.
या निधीमधून जुना नरडवे रस्ता ते पिळणकरवाडी या दरम्‍यान १८ मिटरचा चौपदरी रस्ता होणार आहे. या रस्त्यावर दुभाजक, पथदीपही आणि फुटपाथ बांधले जाणार आहेत. रिंगरोंडच्या पहिल्‍या टप्प्यातील गांगो मंदिर हिंद छात्रालय ते चौंडेश्‍वरी मंदिर पर्यंतच्या रस्त्याची रूंदी वाढविली जाणार आहे. तर रिंगरोडच्या दुसऱ्या टप्प्यातील चौंडेश्‍वरी मंदिर ते रवळनाथ मंदिर या रस्त्याला फुटपाथ, नळपाणी योजनेचे पाईप, बैठक व्यवस्था, एलईडी स्क्रीन, फुटपाथ आदी बांधले जाणार आहेत. याखेरीज तेलीआळी संजीवनी हॉस्पीटल रस्ता ते मनोहर स्वरूप पर्यंतच्या मार्गावर पथदीप बसवले जाणार आहेत. तसेच गारबेज डेपोमध्ये विद्युतीकरण आणि इतर काही कामे या निधीतून होणार आहेत.
सन २०१८ मध्ये कणकवली नगरपंचायतीची निवडणूक आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून लढविण्यात आली होती. त्‍यावेळी श्री.राणे यांनी कणकवलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्‍वाही दिली होती. गेल्‍या वर्षभरात कणकवली शहराच्या विकासासाठी श्री. राणे यांनी १३ कोटींचा निधी आणून शहरवासीयांना दिलेले वचन पूर्ण केले असल्‍याचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे म्‍हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा