You are currently viewing परुळे येथे ५४ वे तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन

परुळे येथे ५४ वे तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन

परुळे येथे ५४ वे तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन;

उद्या आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन

वेंगुर्ला : प्रतिनिधी

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ५४ वे तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन २७ व २८ नोव्हेंबर रोजी परुळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे.

शुक्रवारी दुपारी २ वाजता पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनात निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा आणि प्रतिकृती मांडणी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी प्रतिकृतींचे परीक्षण, प्रश्नमंजुषा स्पर्धा, पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभ होणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमांची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रदर्शनाचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा