*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा साहित्यरत्न लेखणीसम्राट विचारमंच महाराष्ट्रचे प्रशासक लेखक कवी प्रभाकर भामरे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*|| जीवनाची शाळा ||*
संकटांना भिऊ नको, त्याने माणूस प्रबळ होतो,
अश्रूंमधूनही कधी, हास्यफूल फुलवितो || ध्रु ||
शाळेमध्ये आधी पाठ, मग परीक्षा होते,
जीवनात आधी परीक्षा, मग शिकवण मिळते,
प्रत्येक प्रसंग येथे, गुरु होऊन येतो,
अश्रूंमधूनही कधी, हास्यफूल फुलवितो || १ ||
सुख-दुःखाची ये-जा, हीच जगाची रीत,
अनादी काळापासून चालत आलेली नीत,
जो दुःखामध्येही अर्थ, शोधून घेतो,
अश्रूंमधूनही कधी, हास्यफूल फुलवितो || २ ||
अपयशाच्या अंधारात, आशेचा दिवा पेटतो,
ठेच लागता लागता, माणूस चालायला शिकतो,
काट्यांमधून जाताना, फुलांचा गंध मिळतो,
अश्रूंमधूनही कधी, हास्यफूल फुलवितो || ३ ||
नाही येथे पुस्तक, नाही येथे पाटी,
अनुभवच आहे येथे, ज्ञानाची खरी वाटी,
प्रत्येक क्षण शिकवितो, प्रत्येक पाऊल घडवितो,
अश्रूंमधूनही कधी, हास्यफूल फुलवितो || ४ ||
जीवन हीच शाळा, अनुभव हाच गुरु खरा,
शिकत राहिलास तर, होशील तूच तारा,
प्रत्येक परीक्षेतून, नवा अर्थ घेतो,
अश्रूंमधूनही कधी, हास्यफूल फुलवितो || ५ ||
@ श्री. प्रभाकर भामरे, धुळे (इंदुमाई)
