You are currently viewing कशी आहे माझी मराठी ?

कशी आहे माझी मराठी ?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रा मेहेंदळे (अमेरिका) लिखित मराठी गौरव दिन निमित्त अप्रतिम काव्यरचना…*

 

*कशी आहे माझी मराठी?……*

 

*मराठी..*

 

माझी मायबोली!

म्हणून ती आपली….

 

शब्दांनी नटली!

म्हणून भावली…..

 

काव्यांत रंगली!

म्हणून आवडली….

 

सुरात गायली

म्हणून रंगली…!

 

लेखांत गुंफली!

म्हणून समजली….

 

कथेत गुंतली!

म्हणून रमली…

 

कादंबरीत घुसली!

म्हणून रेंगाळली….

 

विनोदानी हसली !

म्हणून बिलगली….

 

नवरसांत नहाली !

म्हणून समृध्द झाली…

 

अशी मराठी आपली

जिवाभावाची झाली!

 

………..चित्रा मेहेंदळे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − three =