You are currently viewing सांगा हळूच त्यांना

सांगा हळूच त्यांना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सांगा हळूच त्यांना*

 

वृत्त :- आनंदकंद

 

प्रेमात का पडावे सांगा हळूच त्यांना

विरहातही जगावे सांगा हळूच त्यांना

 

आयुष्य फार सुंदर घ्यावे हसून थोडे

दुःखातही हसावे सांगा हळूच त्यांना

 

आनंद खूप होतो जगण्यात रोज येथे

स्वच्छंदही रहावे सांगा हळूच त्यांना

 

सोसून यातनांना मरणात प्राण येतो

कष्टातही रमावे सांगा हळूच त्यांना

 

चंद्रास का छळावे ठाऊक चांदणीला

आकाश न्याहळावे सांगा हळूच त्यांना

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

7588318543.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 11 =