You are currently viewing रक्त गट व प्लाझ्मा दान करण्याची इच्छा असलेल्यानी संपर्क साधावा…

रक्त गट व प्लाझ्मा दान करण्याची इच्छा असलेल्यानी संपर्क साधावा…

मंगेश तळवणेकर व देव्या सूर्याजी यांचे आवाहन

सावंतवाडी

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बऱ्याच वेळा प्लाझ्माची आवश्यकता असते. त्या मुळे त्या त्या रक्त गटाचा प्लाझ्मा शोधणे जिकरीचे बनते. कोरोना झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा त्या त्या रक्त गटाप्रमाणे घेतला जातो. त्यामुळे बऱ्याच पॉझिटिव्ह रुग्णाचे प्लाझ्मा वेळेत न मिळाल्यामुळे प्राण जातात. यासाठी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर व युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींनी आपला रक्त गट व प्लाझ्मा दान करण्याची इच्छा असेल तर कृपया आमच्याशी संपर्क करावा व आपला मोबाईल नंबर, पत्ता एसएमएस करावा, अशी विनंती मंगेश तळवणेकर व देव्या सूर्याजी यांनी केली आहे. जेणेकरून कराड येथील मुनेरा बागवान. हिला प्लाझ्मा शोधण्यासाठी त्रास झाला तसा या पुढे अन्य कोणालाही होऊ नये असा या मागचा मुख्य उद्धेश असल्याचे मंगेश तळवणेकर यांनी सांगितले. यासाठी मंगेश तळवणेकर- ९४२१२६९४४४/८८०६५४२४२४ व देव्या सूर्याजी- ९९२२०८८२३८ या नंबरवर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा