विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
प्रसिद्ध कवी – गझलकार आणि शब्दगंधर्व साहित्य परिवार, जत चे संस्थापक अध्यक्ष विनायक तथा सुरेश कुलकर्णी यांना ‘आभार वेदनांचे ‘ या गझलसंग्रहासाठी २०२६ साठीचा गडचिरोली येथील *नाट्यश्रीचा राज्यस्तरीय महामृत्युंजय वाड्.मय पुरस्कार जाहीर झाला आहे. नाट्यश्री चे प्रमुख व ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी नुकताच हा पुरस्कार जाहीर केला आहे.
विनायक कुलकर्णी यांचे तीन कवितासंग्रह व गझलसंग्रह प्रकाशित झाले असून त्यांना विविष राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. जत तालुक्यात साहित्य चळवळ वृद्धिंगत करून नवोदित व नामवंत साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी ‘शब्दगंधर्व साहित्य परिवाराची स्थापना केली असून, दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. समरसता साहित्य परिषद जिल्हा सांगली ते विद्यमान अध्यक्ष आहेत.
विनायक कुलकर्णी १९९६ पासून अनेक अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये आपल्या कविता व गझल सादर करून रसिकप्रियता मिळवली आहे. त्यांनी अनेक संमेलनात गेय काव्य- गझल रचना सादर करून स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. महामृत्युंजय वाड्.मय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल साहित्यिक व काव्यरसिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
