You are currently viewing जिल्ह्यात 20 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश

जिल्ह्यात 20 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश

जिल्ह्यात 20 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी

 जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 6 डिसेंबर रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी 24.00 वाजेपर्यंत जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे.

          सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.  तसेच अलीकडील काही काळात राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकमेकांच्या विरोधात केलेल्या टीका- टिप्पणीमूळे जिल्ह्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या पर्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षातील प्रतिस्पर्धी गट आपापल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करुन एकमेकांना लक्ष करत असून त्यातून काही ठिकाणी आंदोलनात्मक घटना घडून कायदा व सुव्यवस्थ्‍ोचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक मागणीकरिता उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको वैगरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येत असते. त्यामुळे या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे.

कलम 37 (1)

Ø  शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.

Ø  अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.

Ø  दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे.

Ø  व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)

Ø  सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे.

Ø  सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.

कलम 37(3)

Ø सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे.

Ø हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न  इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही .

         वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =