आरोंद्यात चौथ्या पर्वाची भव्य खुली नरकासुर स्पर्धा; आकर्षक पारितोषिकांची घोषणा!
श्री देव राष्ट्रोळी कला क्रीडा मंडळ आणि ॲड. मनोज विजय आरोंदेकर मित्र मंडळाच्या सहकार्याने आयोजन; सहभागी सर्व मंडळांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू
आरोंदा :
श्री देव राष्ट्रोळी कला क्रीडा मंडळ, देऊळवाडी-आरोंदा आणि ॲड. मनोज विजय आरोंदेकर मित्र मंडळ, आरोंदा यांच्या सहकार्याने भव्य खुल्या नरकासुर स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ट्रिकसीन आणि नॉन-ट्रिकसीन अशा दोन विभागांत आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
ट्रिकसीन विभागात प्रथम क्रमांकासाठी १३ हजार ३३३ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ११ हजार १११ रुपये, तृतीय क्रमांकासाठी ९ हजार ९९९ रुपये, तर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून ४ हजार ५५५ रुपये देण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिक ॲड. मनोज विजय आरोंदेकर यांनी, द्वितीय पारितोषिक कै. उल्हास तातू नाईक यांच्या स्मरणार्थ नंदकिशोर तातू नाईक यांनी, तृतीय पारितोषिक श्री देव राष्ट्रोळी कला क्रीडा मंडळाने, तर उत्तेजनार्थ पारितोषिक सौरभ मनोहर आरोंदेकर यांनी पुरस्कृत केले आहे.
नॉन-ट्रिकसीन विभागात प्रथम क्रमांकासाठी ७ हजार ७७७ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार ५५५ रुपये, तृतीय क्रमांकासाठी ३ हजार ३३३ रुपये, तर उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी २ हजार ५५५ रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी अनुक्रमे बंटी उर्फ ऋषिकेश हनुमंत नाईक, कै. मुकुंद विनायक आरोंदेकर यांच्या स्मरणार्थ सागर मुकुंद आरोंदेकर, भरत वामन नाईक आणि दिनेश दिलीप कासार यांनी पारितोषिके पुरस्कृत केली आहेत.
स्पर्धेतील सर्व चषक, सन्मानचिन्हे तसेच भेटवस्तूंचे प्रायोजकत्व ॲड. मनोज विजय आरोंदेकर यांनी स्वीकारले आहे. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक मंडळाला सन्मानचिन्ह आणि योग्य ती भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
