You are currently viewing रक्तदानाच्या सेवाकार्यासाठी रामपुरुष युवा मित्र मंडळाचा ‘सिंधू आरोग्य यात्रेत’ सन्मान

रक्तदानाच्या सेवाकार्यासाठी रामपुरुष युवा मित्र मंडळाचा ‘सिंधू आरोग्य यात्रेत’ सन्मान

रक्तदानाच्या सेवाकार्यासाठी रामपुरुष युवा मित्र मंडळाचा ‘सिंधू आरोग्य यात्रेत’ सन्मान

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान; मंडळाच्या रक्तदान उपक्रमाचे कौतुक

शिरोडा :

शिरोडा-परबवाडी येथील रामपुरुष युवा मित्र मंडळाला त्यांच्या सातत्यपूर्ण रक्तदान सेवाकार्याबद्दल ‘सिंधू आरोग्य यात्रे’दरम्यान सन्मानित करण्यात आले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते मंडळाला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
रामपुरुष युवा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी नियमितपणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी मंडळाचे सदस्य स्वतः संबंधित ठिकाणी जाऊन रक्तदान करतात. मंडळाच्या या सामाजिक आणि सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा