फोंडाघाट रस्त्यावर मोकाट गुरांचा ठिय्या; अपघाताचा धोका वाढला!
रस्त्यावरच गुरांचा मुक्काम; वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, ग्रामपंचायत व प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी
फोंडाघाट :
फोंडाघाट परिसरातील रस्त्यावर मोकाट गुरांचा वावर वाढला असून, रस्त्यावरच गुरे बसून राहत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः अचानक वाहनांसमोर गुरे आल्यास अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रस्त्यावर बसलेल्या गुरांमुळे दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली गुरे वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे.
