सावंतवाडी विकासाची नांदी…!
दीपक केसरकरांच्या हातावर संजूचा हात.... सावंतवाडी विकासाची नांदी...!

सावंतवाडी विकासाची नांदी…!

दीपक केसरकरांच्या हातावर संजूचा हात….
सावंतवाडी विकासाची नांदी…!

♦रविवार दि. 12 जानेवारी रोजी सावंतवाडी नगरपालिका आणि सिंधुदुर्ग लाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह आणि नेत्ररूग्ण तपासणी शिबिर पार पडलं. कित्येक गरजू रुग्णांना या शिबिराचा फायदा झाला. सावंतवाडी नगरपालिका असे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवित असते, त्याला बऱ्याच सामाजिक संस्थाचा मोलाचा हातभार लाभतो. सिंधुदुर्ग लाईव्ह ने सुद्धा असच मोलाचं कार्य करत जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

♦मधुमेह आणि नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटन माजी पालकमंत्री दीपक केसरकर आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी सामाजिक व्यासपीठावर येताना दोघेही एकदिलाने एकत्र येताना दिसले. उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर केसरकर दीप प्रज्वलन करताना संजू परब यांनी केसरकरांच्या हातावर आपला हात ठेवत सावंतवाडीच्या विकासासाठी जणू काय एकत्र येत आहोत याची नांदीच दिली.

♦दीपक केसरकर हे विकासाचे व्हिजन असलेले नेते आहेत, विकासासाठी निधी आणण्याची त्यांची कुवत आहे. परंतु आणलेल्या निधीचे योग्य नियोजन आणि विनियोग नगरपालिका पातळीवर होणे गरजेचे आहे. गेली काही वर्षे करोडो रुपयांचा निधी सावंतवाडी नगरपालिकेत आला, परंतु मावळते नगराध्यक्ष आणि केसरकर यांच्या निर्माण झालेल्या दुराव्यामुळे, आणि श्रेयवादाच्या भोवऱ्यात तो निधी गुरफटून गेला, पर्यायाने सावंतवाडी नगरपालिका विकासापासून चार हात दूर राहिली.

♦संजू परब यांनी केसरकर यांच्या हातावर हात ठेवून हातात हात घेऊन काम करणार असल्याचेच दाखवून दिले आहे. यापूर्वीही त्यांनी विकासासाठी केसरकर यांची जरूर मदत घेऊ असंही जाहीर केलं होतं. त्यामुळे कालच्या कार्यक्रमापासून हे दोघेही एकत्र येऊन सावंतवाडीच्या विकासासाठी काम करतील अशी आशा निर्माण झाली आहे.

♦भविष्यात हे दोघेही सावंतवाडीच्या भल्यासाठी, विकासासाठी एकत्र येऊन काम करतात की काय हे येणारा काळच ठरवेल…
आणि सावंतवाडीकर जनता ते याच डोळी याच नेत्री पाहतील….!!

प्रतिक्रिया व्यक्त करा