सुवर्ण महोत्सवी योजनेअंतर्गत अनुदान घेणाऱ्या शहीद जवानांच्या पत्नींनी हयातीचे दाखले सादर करावेत
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील सुवर्ण महोत्सवी योजनेअंतर्गत अनुदान घेणाऱ्या शहीद जवानांच्या पत्नींनी जिल्हा सैनिक कार्यालय सिंधुदुर्ग येथे हयातीचा दाखला सादर करावा, असे आव्हान सहायक सैनिक जिल्हा कल्याण अधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सहा शहीद जवानांच्या पत्नी यांना सुवर्ण महोत्सवी योजनेअंतर्गत जिल्हा सैनिक कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडून दरमहा अनुदान अदा करण्यात येते. सदर लाभार्थी ह्या वयोवृद्ध असल्याने शासनाच्या नियमानुसार वर्षातून प्रत्येक सहा महिन्याने (३१ मे व ३० नोव्हेंबर) हयातीचे दाखले घेऊनच अनुदान अदा करण्याचे निर्देश आहेत. तरी सुवर्ण महोत्सवी योजनेअंतर्गत अनुदान घेणाऱ्या शहीद जवानांच्या पत्नी यांनी दरवर्षीप्रमाणे ते हयात असल्याबाबतचा दाखला संबंधित बँक/ सरपंच/ ग्रामसेवक यांचे कडून सही व शिक्क्यासह प्राप्त करून घेऊन त्यासोबत माजी सैनिक विधवा पत्नी ओळखपत्र व बँक पासबुकच्या छायांकित प्रतिसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दिनांक ३० मे २०२६ पर्यंत सादर करावे. सदर दाखले दिलेल्या मुदतीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्राप्त न झाल्यास दिनांक १ जून २०२६ पासून मासिक अनुदान दाखला प्राप्त होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय दूरध्वनी क्रमांक ०२३६२- २२८८२०/९८३४४६५९०४ वर संपर्क करावा असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
