You are currently viewing संघटीत गुन्हेगारी  विरुध्द जिल्हा पोलीसांची मोक्का कायद्यान्वये धडक कारवाई

संघटीत गुन्हेगारी  विरुध्द जिल्हा पोलीसांची मोक्का कायद्यान्वये धडक कारवाई

सिंधुदुर्गनगरी

सांवतवाडी तालूक्यात गवळी तिठा येथे रस्तावर वाहन आडवून लुटमार केल्याप्रकरणी  गुन्हायाचे गांभीय ओळखुन पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग राजेंद्र दाभाडे , अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग  तुषार पाटील यांनी पोलीस निरीक्षक,गुन्हे शाखा सिंधुदुर्ग सुनिल धनावडे यांना विशेष पोलिस तपास पथक तयार करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे विशेष  पोलीस पथक तयार करुन पथकामार्फत गुन्ह्यांतील आरोपीत यांना 24 तासात निष्पन्न करुन आरोपी चंदन ऊर्फ सनी अनंत आडेलकर व अक्षय अजय भिके यांना अटक केली. गुन्हायाचे तपासात आरोपीत यांच्या कडून फिर्यादी यांचा चोरुन नेलेला मोबाईल हॅण्डसेट, गुन्ह्यात वापरलेला चाकु, डिओ स्कूटर व अन्य साहित्य जप्त करण्यात आलेले. फिर्यादी यांच्यावर गोवा मेडीकल कॉलेज बांबुळी गोवा या ठिकाणी उपचार चालु असताना  दिनांक 16 डिसेंबर 2020 रोजी मुत्य झाला. त्याबाबत गुन्ह्यात भा. द. वि. कलम 302 हे समाविष्ठ करण्यात आलेले आहे.

         अटक आरेपीत यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व नजिकचे गोवा राज्यातील गुन्हेगारी अभिलेखाची पडताळणी केली असता आरोपीनवर  10 वर्षात खुन ,बलत्कार, फसवणुक ,चोरी, असे एकूण 20 गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या गुन्हेगारी अभिलेखावरुन ते सराई व संघटीत टोळी करुन वारंवार गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले.

          संजय मोहीते, पोलीस उप महानिरीक्षक कोकण परीक्षेत्र, नवी मुंबुई यांचे आदेशाने मोक्का कायद्यानुसार गुन्ह्याचा तपास  उप विभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी डॉ. रोहीणी सोळंके ह्या वरीष्ठ महीला अधिकारी करीत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहिती संकलित करुन अशा संघटीत गुन्हेगारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे सातत्य यापुढे ठेवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने गुन्हेगारांचे गुन्हेगारी रेकॉड व त्यांचे नावाची यादी बनविण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक स्थागुशा, सिंधुदुर्ग यांनी दिली .

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =