You are currently viewing जिल्हा बँक निवडणुकीचे वेध…

जिल्हा बँक निवडणुकीचे वेध…

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचे वेध लागले आहेत, भाजपा विरुद्ध शिवसेना अशी प्रतिष्ठेची लढत होणार आहे. या लढतीत काँग्रेस व राष्ट्रवादी समसमान जागा वाटपाचा फॉर्म्युला पुढे करून, जिल्हा बँकेवर आपले अस्तित्व मिळण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकवर कै. सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांचे वर्चस्व होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जिल्हा बँकेवर आपली एक हाती सत्ता मिळविली. विद्यमान जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी राणे यांच्यापासून दूर होत शिवसेनेची कास धरली. त्यामुळे येत्या जिल्हा बॅक निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्हा बँकतून सतीश सावंत यांचा पायउतार होण्यासाठी राणे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनविणार हे निश्चित आहे. या निवडणुकीत सतीश सावंत यांच्या विरोधात भाजपचे महेश सारंग रिंगणात असतील अशी चर्चा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 17 =