You are currently viewing शेतात ट्रॅक्टर चालवताना 34 वर्षीय तरुणाचा गंभीर अपघात

शेतात ट्रॅक्टर चालवताना 34 वर्षीय तरुणाचा गंभीर अपघात

शेतात ट्रॅक्टर चालवताना 34 वर्षीय तरुणाचा गंभीर अपघात

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथील रहिवासी *महेश गोविंद मेमन, वय 34* यांचा शेतामध्ये ट्रॅक्टर चालवत असताना गंभीर अपघात झाला. ही घटना सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

येथे *डॉ. मयूर सुळेबावकर, डॉ. सबा लाड खान, डॉ. सपना सागर, डॉ. मयुरी इनामदार*. व परिचारिका *स्नेहल एकावडे*. यांनी प्राथमिक उपचार, उपजिल्हा रुग्णालयामध्ये इंजेक्शन व औषधोपचार केले.

त्यांच्या पायाला व लघवीच्या मार्गावर (गुप्तांगाला) गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना *गोवा-बांबोळी (गोमेकॉ)* येथे पाठविण्यात आले आहे.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाकडून ही माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी दिली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा