You are currently viewing त्रिस्तरीय ग्रामिण विकास यंत्रणेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत विकास व्हावा ; पालकमंत्री उदय सामंत

त्रिस्तरीय ग्रामिण विकास यंत्रणेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत विकास व्हावा ; पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि राज्याच्या विकासासाठी त्रिस्तरीय ग्रामिण विकास यंत्रणा अंमलात आली. यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा समावेश आहे. यंत्रणेला 60 वर्षे पुण होत आहे. त्याबद्दल या त्रिस्तरीय ग्रामिण विकास यंत्रणेला पालकमंत्री उदय सामंत यांनी शुभेच्छा देवून या यंत्रणेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत विकास व्हावा. अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हा परिषदेतील शिवाजी सभागृहात त्रिस्तरीय यंत्रणेला 60 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांत पालकमंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि.प.प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर तसेच विविध खात्यांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मंगलकलश महाराष्ट्रात आणला आणि या महाराष्ट्राची निर्मिती झाली. गेल्या 60 वर्षात अनेक स्थित्यांतरे घडली. विकास कामे झाली. या यंत्रणेच्या माध्यमातून कोरोना कालावधीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी केलेले काम अत्यंत बहुमोल असून यामुळे आपण कोरोना सारख्या संकटावर मात करु शकलो. प्रामुख्याने आरोग्य विभागाने केलेले काम कौतुकास्पद आहे. असे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेमार्फत नवनवीन उपक्रम सुरु करण्यात यावे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात्मक वाढीसाठी काम केले पाहिजे. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी कोरोना काळात काम केल्याने जिल्हा कोरोनामुक्तीकडे गेला आहे. जनता आणि अधिकारी यांनी समन्वयाने काम केल्याने सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे जात आहे. राज्यात ग्रामिण क्षेत्राचा विचार केला तर लसीकरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात क्रमांक एक वर आहे. जिल्ह्यामध्ये पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था न बिघडता केलेले कामही कौतुकास्पद आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुढे 1 मे च्या दिवशी विविध कलागुण सादर करणारा कार्यक्रम कायमस्वरुपी आयोजित करण्यात यावा. त्याचबरोबर अधिकारी-कर्मचारी यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात यावा. सदरचे स्नेहसंमेलन रत्नागिरी-सिंधुदुर्ग यांनी संयुक्तपणे सादर करण्याबाबत विचार व्हावा. असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांनी दशाअवताराचा कार्यक्रम सादर केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =