माणगाव येथील वनकर्मचा-यावर कारवाईसाठी सावंतवाडीत उपोषण…

माणगाव येथील वनकर्मचा-यावर कारवाईसाठी सावंतवाडीत उपोषण…

कार्यभार काढून घेण्याची मागणी; अन्यथा माघार घेणार नाही, जयंत बरेगार…

सावंतवाडी

माणगाव बदलीपास घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या वनपालावर गुन्हा दाखल करा, तसेच “त्या” पदाचा कार्यभार काढून घ्या,अशा मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी सावंतवाडी वनविभागा समोर आज उपोषणास सुरुवात केली आहे.जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही,तोपर्यंत आपण उठणार नाही,असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान २०१९ पासून आपण याचा पाठपुरावा करीत आहे.परंतु संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे न्याय मिळत नाही. त्यामुळे आता आपण गप्प बसणार नाही असे त्यांनी सांगितले. कुडाळ पोलिस ठाण्यात संबंधित वनपलावर गुन्हा दाखल करण्यास चालढकल पणा करीत आहे. त्यामुळे त्यांनी या अगोदर उपोषण करण्याचा इशारा दिला होता.त्यानुसार त्यांनी विविध मागणीसाठी आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा