You are currently viewing नवनियुक्त सहाय्यक मत्स्य आयुक्तांचे मच्छिमार सोसायटी प्रतिनिधीनी केले स्वागत

नवनियुक्त सहाय्यक मत्स्य आयुक्तांचे मच्छिमार सोसायटी प्रतिनिधीनी केले स्वागत

नवनियुक्त सहाय्यक मत्स्य आयुक्तांचे मच्छिमार सोसायटी प्रतिनिधीनी केले स्वागत

मालवण

मालवण येथील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयात सहायक मत्स्य आयुक्त पदी सागर विजय कुसवेकर यांची नियुक्ती झाली असून मालवण तालुक्यातील मच्छिमार सोसायटीच्या प्रतिनिधीनी कुसवेकर यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच मच्छिमारांच्या विविध समस्या व प्रश्नांबाबत कुसवेकर यांचे लक्ष वेधले.

एमपीएससी परीक्षे मधून सागर कुसवेकर यांची पहिलीच नियुक्ती मालवण येथे सहाय्यक मत्स्य आयुक्त म्हणून झाली आहे. सागर कुसवेकर हे मूळ रत्नागिरी दापोली येथील आहेत. मालवण तालुक्यातील मच्छिमार सहकारी सोसायटीच्या प्रतिनिधीनी आज कुसवेकर यांची भेट घेऊन गेल्या दहा वर्षात प्रभारी अधिकारी येत असताना प्रथमच कायमस्वरूपी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी मालवण मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष विकी चोपडेकर व संचालक कमलेश कोचरेकर, सिंधुदुर्ग मच्छिमार संस्थेचे योगेश मंडलिक, रोझरी मच्छिमार संस्थेचे डेनिस नरोना, राजकोट मच्छिमार संस्थेचे सेलेस्तीन डिसोजा, सर्जेकोट मच्छिमार संस्थेचे नितीन आंबेरकर, भद्रकाली मच्छिमार संस्थेचे संतोष रेवंडकर, रामेश्वर मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष जगदीश खराडे आदी उपास्थित होते.

यावेळी विकी चोपडेकर यांनी कुसवेकर यांच्यासमोर मच्छिमारांच्या विविध समस्या मांडताना मच्छिमारांना व्हिआरसी लवकर मिळत नसल्याने मच्छिमारांना कर्ज व शासकीय योजनाच्या लाभ मिळविण्यात अडचणी येत असून व्हीआरसी लवकरात लवकर मिळावी अशी मागणी केली, तसेच मच्छिमारांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी केली. यावर सहायक मत्स्य आयुक्त कुसवेकर यांनी मच्छिमारांना समाधानकारक उत्तरे देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 4 =