You are currently viewing समताधारित समाजनिर्मितीसाठी लढणारे सैनिक राष्ट्र सेवा दल घडविते : सपोनि विकास अडसूळ

समताधारित समाजनिर्मितीसाठी लढणारे सैनिक राष्ट्र सेवा दल घडविते : सपोनि विकास अडसूळ

समताधारित समाजनिर्मितीसाठी लढणारे सैनिक राष्ट्र सेवा दल घडविते : सपोनि विकास अडसूळ

इचलकरंजी: प्रतिनिधी

“राष्ट्र सेवा दलाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अभूतपूर्व आहेच, पण आताही समताधारित समाजनिर्मितीसाठी लढणारे सैनिक राष्ट्र सेवा दल घडविले.” असे मत राष्ट्र सेवा दलाच्या संजीवन विद्यामंदिर, चंदूर येथील शिबिर समारोपप्रसंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ यांनी व्यक्त केले.
इंद्रजीत कदम यांनी प्रास्ताविक केले. मैदानप्रमुख रोहित दळवी यांनी शिबिराचा अहवाल सादर केला. मान्यवरांच्या हस्ते शिबिरार्थींना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मुलांनी झांज, लेझीम, कॅलेस्थेनिक्स, समुहगीते सादर केली. स्मिता पाटील कलापथकाने ‘हर घर संविधान’ पथनाट्य सादर केले.
राष्ट्र सेवा दल, इचलकरंजीच्या कार्याध्यक्ष इंद्रायणी पाटील म्हणाल्या, “किशोरवयीन मुलांच्या मनोभूमीवर संविधानिक मुल्यांची पेरणी करणारे हे शिबिर यशस्वी होणे यात शिक्षक, पालक, बालक आणि लोकसहभाग यांचा सुंदर मिलाफ घडून आला आहे. मालती माने विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय रेंदाळकर म्हणाले, “बाल आनंद संस्कार शिबिरातूनच आदर्श नागरिक घडणार आहेत. व्यावसायिक शिबिरांना फाटा देवून तळागाळातील मुलांपर्यंत कौशल्ये आणि संस्कार पोहचवणेचे महत्कार्य तरुणाईकडून घडते आहे, हे सुचिन्ह आहे. ”
या शिबिरात प्रशिक्षक म्हणून दामोदर कोळी, वैभवी आढाव, ओम कोष्टी, साद चांदकोटी,स्नेहल माळी, अमोल पाटील आदिंनी काम केले. याचा समन्वय करणेसाठी अमित कांबळे, गजानन तोरणे, सचिन शिंदे, विवेक कांबळे यांनी प्रयत्न केले. या प्रसंगी सरपंच स्नेहल कांबळे, महंमद मकुभाई, उपसरपंच संजय जिंदे, वैशाली पाटील, शालनताई पाटील,गजानन जगताप ,नौशाद शेडबाळे, शरद वास्कर, प्रशांत खांडेकर आदि मान्यवरांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुखदेव पाटील यांनी केले तर, लताराणी पाटील यांनी आभार मानले.

 

*संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा