You are currently viewing दगडांमध्येही भाव ओतणाऱ्या कलाकार….भावना प्रभू

दगडांमध्येही भाव ओतणाऱ्या कलाकार….भावना प्रभू

अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या भावना प्रभू यांनी सिद्धांत थिएटर्स कुडाळ आणि साईकलामंच पिंगुळी मधून विविध एकांकिका आणि नाटकांमधून काम केले आहे तसेच विविध बक्षिसे देखील प्राप्त केली आहेत

झी मराठी वरील गाव गाता गजाली मध्ये देखील भुमिका केली आहे तसेच The Satish Kaushik Production House च्या मन उधाण वारा ह्या मराठी चित्रपटात देखील छोटीशी भुमिका केली आहे.

ह्याच अभिनय क्षेत्रात विशेषप्राविण्य म्हणून MPA (Maste In Performing Arts) ही नाट्यशास्त्राची पदवी देखील प्राप्त केलेली आहे.
कोविड मुळे झालेल्या लॉकडाऊन च्या काळात अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद मंडळ,अहमदनगर यांच्याकडून आयोजित केलेल्या Online राज्यस्तरीय अभिनय स्पर्धा 2020 स्पर्धेत सहभागी 150 हून अधिक स्पर्धकांधून प्रथम क्रमांक व सुवर्णपदक पटकविण्याचा मान भावना प्रभू यांना मिळाला.-
समुद्र, नदी यांचे लहानपणापासूनच आकर्षण. त्यातूनच नदीच्या किनाऱ्यावरील दगडांचे चित्रकृती मधे रूपांतर करण्याची कल्पना त्यांना सुचली आणि प्रयत्नांती ती प्रत्यक्षात उतरली. Acrylic रंगांच्या सोबतीने निर्जीव दगडांची चित्रे सजीव होऊन फ्रेम मधे रूपांतरित झाली. नदिवर जाऊन विविध आकाराचे दगड गोळा करणे, ते वेगवेगळ्या पद्धतीने रचवून पाहणे, आवश्यकतेनुसार त्यांना रंगवणे , कलाकुसर करणे आणि एक कलाकृती निर्माण करणे हा फावल्या वेळेतला उद्योग. त्याचीच पुढची पायरी म्हणजे कलाश्री मेहेंदी च्या सोबतीने स्टोन आर्ट. या कलेला व्यावसायिक रूप देण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. दगडांचे विविध आकार चित्रबद्ध करून तयार कलाश्री स्टोन आर्ट फ्रेम्स कुडाळ मधे उपलब्ध आहेत.

तसेच एक वेगळा प्रयत्न म्हणजे
काळाच्या ओघात हरवत चाललेले पारंपारिक आणि चुलीवरचे विविध पदार्थ लोकांपर्यंत पोहोचावेत आणि विस्मृतीत गेलेल्या रुढी,परंपरा आणि एखादा पदार्थ करण्याची विशिष्ट आणि पारंपारिक पद्धत लोकांमध्ये पुन्हा जागृत करण्यासाठी भावना प्रभू यांनी केलेला छोटासा प्रयत्न म्हणजेच Youtube Channel माईची चूल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 15 =