*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
🔱 *”त्रिशूल”*🔱
त्रिशूल करी अखंड ऊर्जा स्रोत प्रदान
त्रिशूल शिव शक्ती मिलनाचे केंद्र स्थानIIधृII
शिव देवादिकांचे त्रिशूल आहे आयुध
प्रतिक सत्व रज तम गुणांचे फाळ तीन
कफ पित्त वात त्रिदोषांचे करी निवारणII1II
त्रिशुलाची पूजा करीता लाभे पुण्य त्रिगुण
शिव मारती हिंस्त्र प्राणी आसूर त्रिशूलानं
त्रिशूल करी पर्यावरणाच जागेचे रक्षणII2II
मूल दंड महामनी बिंदू धारा पाती तीन
दंडातून फुटले छेद करणारे त्रिपात
ऊर्जा गती नियंत्रित करी त्रिशूल एकत्रितII3II
त्रिशूल आहे ब्रह्मा विष्णू महेश तत्व त्रिगुण
ब्रह्मांड पृथ्वी स्वर्ग योग वापर एकत्रित
महागौरी लक्ष्मी सरस्वती देवी शक्ती तीनII4II
ईडा पिंगला सुषूम्ना नाड्या आहेत तीन
शिव शक्तीने मिळती धारा गती दिशा गुण
समतोलत सर्व गोष्टी शिव त्रिनेत्रांनंII5II
©️काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत रायगड.महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
