You are currently viewing युक्रेन

युक्रेन

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य माजी पोलीस अधिकारी वासुदेवराव खोपडे यांची काव्यरचना

पुतीनजी जरा ऐका
ऐका झेलसकी भाई
अहंकार सोडा तुम्ही
थांबवा रक्ताची होई !!

खर काय खोट काय
नसेल मले कयत
दोघे नाटोच गऱ्हाणं
किती बसाल दयत !!

नाटो एक जबाबदार
नाही पिपयाचा पार
कामाच्या वेळीच राज्या
कसे झाले हो फरार !

झेलू भाऊ तुले राजा
काहून नाही कयत
भावाच्या भरोश्यावर
लग्न नाहीत करत !!

बायडन काका थांबा
तुम्ही काळ्या नका करू
माणुसकीचा अंत झाला
माणूस लागला मरु !!

किव झालंय उध्वस्त
सैरभैर झाले जीव
भुकेलेल्या त्या जीवांची
जरा येऊ ध्या हो कीव !!

मायभूचा अभिमान
असावा सर्वांचे मनी
स्वामीत्वावर कुणाच्या
घाव घालू नये कुणी !!

युद्ध नको शांती हवी
घ्या हो बुद्धांचे विचार
रशियाने थांबवावा
हा युक्रेनचा संहार !!

वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =