You are currently viewing पळस फुलला

पळस फुलला

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी निवृत्त पोलीस अधिकारी वासुदेवराव खोपडे यांची काव्यरचना

आला शिशिर शिशिर
रान ऊजाळलं सारं
तरु वल्लीच्या डोयाले
कशी लागलिया धार !!

अंगाचीया लाही लाही
झाडं झालय नागड
पानं झडलिया सारी
आली आली पानगड !!

गावं गायरानात रे
कसं तांबडं फुटलं
केसरी आभाळ जसं
माळरानी उतरलं !!

रंगाची रे ऊधळण
सडा फुलांचा सांडला
रंगपंचमीचा सण
रानी पळस फुलला !!

उभ्या पळसात दिसे
कृष्ण मुरारी सावळा
रंगे रंगलारे रानी
रासक्रीडेचा सोहळा !!

वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556

प्रतिक्रिया व्यक्त करा