मालवण | प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग मालवणचे साहित्यिक, लेखक तथा कादंबरीकार व संपादक, पत्रकार सुयोग पंडित यांच्या उल्लेखनीय साहित्यिक योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६ मध्ये २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ नंतरच्या सत्रात हा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर आणि राज्यातील विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
