You are currently viewing प्रतिष्ठान च्या वतीने वैभववाडी येथे पोलिसांना छत्री वाटप

प्रतिष्ठान च्या वतीने वैभववाडी येथे पोलिसांना छत्री वाटप

 वैभववाडी

एडगांव फौजदारवाडी येथील शिवराणा प्रतिष्ठानच्या वतीने पोलिसांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य व पोलीस प्रशासनाने महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे खरे कोरोना योध्दे आहेत. सामाजिक बांधिलकेतून प्रतिष्ठानच्या वतीने छत्र्या पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे सुफुर्द केल्या. यावेळी उपनिरीक्षक प्रवीण देसाई, प्रतिष्ठानचे प्रतिनिधी गोविंद उर्फ बंटी रावराणे, प्रीती रावराणे, रश्मी रावराणे, सुशील रावराणे, अथर्व रावराणे, अक्षय रावराणे, जय रावराणे, मनिष रावराणे, अतुल साटम आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + seventeen =