You are currently viewing युवा बेरोजगार खेळाडुंची क्रीडा संकुलावर हंगामी “क्रीडा प्रशिक्षक”म्हणून नियुक्ती करावी

युवा बेरोजगार खेळाडुंची क्रीडा संकुलावर हंगामी “क्रीडा प्रशिक्षक”म्हणून नियुक्ती करावी

युवा बेरोजगार खेळाडुंची क्रीडा संकुलावर हंगामी “क्रीडा प्रशिक्षक”म्हणून नियुक्ती करावी : शिवदत्त ढवळे

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळची मागणी

कासार्डे / दत्तात्रय मारकड :-

महाराष्ट्रातील सर्व क्रीडा संकुलां मध्ये “खेळ व क्रीडा”मध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीयआंतर विद्यापीठ राज्य” पातळीवर वरीष्ठ तसेच ज्युनियर वयोगटातील सर्व मान्यता प्राप्त खेळातील “पदवीधर युवा बेरोजगार खेळाडु” वर्गांची सर्व क्रीडा संकुलावरती हंगामी “क्रीडा प्रशिक्षक” म्हणून मानधना” वरती नियुक्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ राज्य संघटनचे सहसचिव शिवदत्त ढवळे यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य स्पोर्टस् इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, या”क्रीडा धोरण-12च्या निकषा अंतर्गत नविन शासन द्वारा”विभागीय, जिल्हा तसेच तालुका क्रीडा संकुलाच्या शासकीय प्रशासकीय व्यवस्थापन समिती”ची फेररचना करून अखिल महाराष्ट्र राज्य स्तरावर सर्व पालकमंत्र्यांना समितीचे “अध्यक्ष पद”बहाल करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील सर्व क्रीडा संकुल हे महाराष्ट्र राज्य शासनाला”मेंटनस, विद्यार्थी खेळाडु प्रशिक्षणार्थींना विविध “खेळ व क्रीडा”प्रकारां च्या प्रशिक्षकांची असलेली क्रीडा संकुला मध्ये अनुउपलब्धता,क्रीडा साहित्य उपलब्धता निधीचा अभाव,नविन खेळ व क्रीडा प्रकारांच्या सुविधा निर्मिती साठी अपुरा क्रीडानिधी,खाजगी प्रशिक्षकांची सर्व क्रीडा संस्थांमध्ये व्यावसायिक स्तरावर थाटलेली दुकानदारी आणि त्याला अधिकारी वर्गांचे पाठबळ,क्रीडा संकुलांमध्ये ज्या खेळ व क्रीडा प्रकारां च्या सुविधा उपलब्ध त्याचे महाराष्ट्रा मधील सर्व क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे. कार्यालय मध्ये अधिकृत मान्यता प्राप्त प्रशिक्षक वर्गांची गेली दहा वर्षे पासुन नेमणुकी नाहीत.

अपेक्षा आहे की,आता आपल्या मंत्री महोदय यांच्या कडे कोणते ही कारण शिल्लक नाही सांगायला की,प्रशासकीय अधिकारी आमचे ऐकत नाही याकारणाने आम्ही “क्रीडा संकुलामध्ये”खेळ व क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षण सुविधा तसेच त्याकरिता क्रीडा प्रशिक्षकांची नियुक्ती करू शकत नाहीत,तर?सर्व प्रथमतः स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पदवीधर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,आंतर विद्यापीठ, राज्य पातळीवर वरीष्ठ,ज्युनियर पातळीवर प्राविण्य प्राप्त केलेल्या तसेच बि.पी.एड., बि.पी.ई., एम.पी.एड., क्रीडा क्षेत्रातील गुणवंत तसेच होतकरू क्रीडा पदवीधर सुशिक्षीत बेरोजगार युवांना अखिल महाराष्ट्र राज्य स्तरावर सर्व ” राज्य,विभागीय, जिल्हा तसेच तालुका क्रीडा संकुलमध्ये शालेय विद्यार्थी खेळाडू वर्गां करिता “ठराविक मानधना” वरती “खेळ व क्रीडा” प्रकारां च्या प्रशिक्षणा साठी प्रथमतः नियुक्ती प्रदान करण्यात यावी हिच किमान अपेक्षा आहे. उपरोक्त संदर्भीय बदलाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य स्तरावर सर्व पालकमंत्री महोदयांनी हा बदल तात्काळ करावा अशी मागणी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =