You are currently viewing आमदार नितेश राणेंनी घेतलेल्या पाणीटंचाईच्या  दखलीनंतर उद्यापासून कणकवलीत होणार नियमित पाणीपुरवठा 

आमदार नितेश राणेंनी घेतलेल्या पाणीटंचाईच्या  दखलीनंतर उद्यापासून कणकवलीत होणार नियमित पाणीपुरवठा 

कणकवली

कणकवली शहरात मागील 4 दिवस तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे.याची दखल आमदार नितेश राणेंनी घेत प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीही याचा पाठपुरावा प्रशासनाकडे केला होता. त्यानुसार उद्या गुरुवारपासून कणकवली वासीयांना नियमित पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा