You are currently viewing उपजिल्हा रूग्णालयाचे मजले वाढवून सावंतवाडीतच “मल्टीस्पेशालिटी”…

उपजिल्हा रूग्णालयाचे मजले वाढवून सावंतवाडीतच “मल्टीस्पेशालिटी”…

जिल्हा शल्य चिकित्सकांचे आश्वासन; अण्णा केसरकर यांचे आंदोलन मागे…

सावंतवाडी

सद्यस्थितीत असलेल्या उपजिल्हा रूग्णालयाच्या नव्या इमारतीवर आणखीन तीन मजले वाढवून “मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल” उभे करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे. तसा प्रस्ताव प्रधान आरोग्य सचिवांकडे पाठविण्यात येणार आहे, अशी भूमिका जिल्हा शल्य चिकित्सकांकडून घेण्यात आली आहे. याबाबतची माहिती सावंतवाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी दिली. दरम्यान जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून मल्टी स्पेशालिटी उभारण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात आल्यामुळे २६ जानेवारीला पुकारलेले उपोषण आपण मागे घेत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + fourteen =