You are currently viewing साईबाबा भक्त मंडळाकडून बांदा केंद्रशाळेला फॅन भेट देऊन शाळेविषयी व्यक्त केली कृतज्ञता

साईबाबा भक्त मंडळाकडून बांदा केंद्रशाळेला फॅन भेट देऊन शाळेविषयी व्यक्त केली कृतज्ञता

बांदा
श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा व शाळेचे माजी विद्यार्थी यांच्याकडून जिल्हा परिषद बांदा केंद्रशाळेला सिलिंग फॅन भेट देऊन शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली .
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका साै सराेज नाईक यानी मंडळाच्या सर्व विश्वस्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष रविंद्र मालवणकर, खजिनदार राजेश केसरकर, विश्वस्त प्रितम हरमलकर, संकल्प केसरकर सौ शुभेच्छा सावंत आदि मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

लाॅकडाऊन कालावधीत गेले वर्षभर लोकसहभागातून बांदा केंद्रशाळेचे रूपडे बदलण्यात येत असून शाळेसाठी माजी विद्यार्थी, सार्वजनिक मंडळे, पालक व दानशूर व्यक्ती यांच्या दातृत्वातून शाळेचा चेहरामोहरा बदलण्यात येत आहे.

साईबाबा भक्त मंडळाने शाळेच्या सभागृहात सिलिंग फॅनची आवश्यकता लक्षात घेऊन हे फॅन मुख्याध्यापक सरोज नाईक यांचेकडे सुपूर्द केले. शाळेला प्राप्त झालेल्या देणगीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर व सर्व सदस्यांनी दात्यांचे आभार मानले असून शाळेला मिळत असलेल्या लोकसहभागाबद्दल पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 5 =