*मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गणपती बाप्पा*
आले आले हो गणपती बाप्पा
लक्ष्मीची व्हावी आज कृपा
ज्ञान देणारी शारदामाता
देव आले हो भूवरी आता
ढोल, मृदंग वाजती भारी
भक्त मंडळी नाचती सारी
घुमघुमतो आज हो ताशा
बाप्पा पुरविती आमची आशा
लाडू मोदकाने ताटे भरती
पंचपक्वान्ने सुवासिनी करती
उंदीरमामाची सोबत स्वारी
त्यांचा डोळा आहे लाडुवरी
किती सुंदर सजली मखरे
सोबतीला हार अन् तुरे
मारु नका हो नुसत्या गप्पा
कामे झटपट झटपट आटपा
बसवा त्यांना हो आसनावरती
त्यांना ओवाळा पंचारती
आज लावा हो धूप आणि दीपा
त्यांची असावी आम्हावरी कृपा
जगी तारण्या आम्हा हो आली
तेज त्यांच्या मुखावरी भारी
भुललो पाहूनी आज त्यांच्या रुपा
द्यावा आशिष आम्हाला बाप्पा
– अरुणा गर्जे
सांगली
