You are currently viewing सत्ताधारी व लोकप्रतिनिधी दिखाऊपणा करून लोकांच्या आरोग्य समस्यांकडे करत आहेत दुर्लक्ष

सत्ताधारी व लोकप्रतिनिधी दिखाऊपणा करून लोकांच्या आरोग्य समस्यांकडे करत आहेत दुर्लक्ष

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा आरोप

कणकवली

येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य शिबीर आयोजित करून गरजूवर विविध शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी 5 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. मात्र, आरोग्य विभागाने ढिसाळ नियोजन करत कुणाही तज्ञ डॉक्टर बाहेरून न बोलविता, येथील उपलब्ध डॉक्टराकडूनच तपासणी व शस्त्रक्रियेबाबत नियोजन केले आहे. दि. 17ते 20 मार्च रोजी हे शिबीर होत असून याबाबत पुरशी प्रसिद्धी करण्यात आलेली नाही. सत्ताधारी व लोकप्रतिनिधीहि केवळ दिखावूपणा करत असून लोकांच्या आरोग्याच्या समस्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यानी केला आहे. उपजिल्हा रुiणालयासाठी आरोग्य तपासणी व तज्ञ डॉक्टराच्या माध्यमातून शस्त्रक्रियासाठी नुकताच पाच लाख रुपयाचा निधी उपलब्ध आहेत. त्यानुसार उपजिल्हा रुiणालयाकडून दि. 17ते 20 मार्च रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी केवळ स्थनिक डॉक्टरानाच बोलावण्यात आलेले आहे. वास्तविक हे डॉक्टर एनआरएचएममधूनहि नेहमीच उपलब्ध असतात. त्यामुळे जिल्हय़ाबाहेरून तज्ञ डॉक्टर बोलावून गोरगरीबाना अत्यावश्यक सेवा देण्याबाबत नियोजन होण्याची गरज होती. मात्र, त्यादृष्टीने गाभीर्य दाखविण्यात आलेले नसल्याचे दिसून येते. तत्कालीन वैद्यकीय अधिक्षक कै. डॉ. सहदेव पाटील यानी असे शिबीर आयोजित तज्ञ डॉक्टर बाहेरून आणून तपासणी व शस्त्रक्रिया केल्या होत्या. त्यावर 70 हजार रुपयेच खर्च झाले होते. दि. 17ते 20 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिबीराबाबत सर्वसामान्याना माहिती नाहि. वास्तविक गावपातळीवर आरोग्य सेवक, सेविकांमार्फत हि माहिती पोहोचवून खऱया गरजूना लाभ मिळवून देण्याची गरज होती. पाच वर्षापुर्वी खासदाराकडूनहि दिव्यागासाठी असेच शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यातील साहित्य आजहि उपजिल्हा रुiणालयात पडून आहे. अशी शिबीरे केवळ निधी खर्च करण्यासाठी होऊन उपयोग नाहि. त्याचा खऱया गरजूना लाभ झाला पाहिजे. यासाठी जे तpज्ञ येथे उपलब्ध नाहित, त्यांना बाहेरून बोलावून नियोजन करण्याची गरज होती. मात्र, तसे काहिच केल्याचे दिसत नाहि. तसेच लोकप्रतिनिधीही अशा समाजोपयोगी गोष्टींकडेकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. केवळ प्रसिद्धीपुरताच या सत्ताधारी व लोकप्रतिनिधीचा पुढाकार असतो, असे दिसून येते. या शिबीराचा लाभ सर्वसामान्याना होण्यासाठी तज्ञ डॉक्टर जिल्हय़ाबाहेरून बोलावून तसे नियोजन करण्यात यावे, अशी मागणीहि श्री. उपरकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =