You are currently viewing माझा साहित्य प्रवास

माझा साहित्य प्रवास

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*

 

*माझा साहित्य प्रवास*

 

मला कळतं तसं वाचनाची गोडी होती,आहेही.बाबा नेहमीच आम्हाला पुस्तकं आणत ,आईलाही साहित्य,,पुस्तक वाचन आवड,पेपर यायचे घरी इंग्रजी मराठीचे.बदल्यांमुळे गाव बदललंकी शाळेत नाव आणि मुलांची लायब्ररीसोबतच सुरू होत असे.

शाळेतही माझे उतारे,निबंध छान असत.शिक्षक इतर विद्यार्थ्यांना वाचून दाखवत.तेव्हा लेखन जमतंय एवढंच कळलं.

घरपोच दर्जेदार मासिके ,घरी येत,किर्लोस्कर,वसंत,मानिनी,माणूस व तत्सम दर्जेदार …त्यात नामवंत लेखिकांचे लेख,कविता वाचण्यात येई.

लग्नानंतर घरही साहित्यिक आवडीचं..तिथेही खूप वेगवेगळी..लायब्ररीतील,घरची,

पौराणिक,ऐतिहासिक,सामाजिक विषयाची पुस्तकं वाचायचे.

अशातच मनात कविताही भिरभिरू लागली…वयाच्यापंचवीशीत मी कविता लिहू लागले.सुचली की,वेळात वेळ काढून डायरी,कोरी पाने,चिठ्ठ्या,तर कधी हाती येईल त्या कागदावर लिहून पाटातील कप्प्यात ठेऊ लागले.त्या सगळ्यांची बहिणीने मला एक डायरी फायनली करून दिली.आधी मी विशेष कोणाला सांगत,दाखवतही नव्हते.आणखी गंमत म्हणजे आधीच्या काही कविता मी सासरचं नाव” दमयंती” या नावानेच लिहिल्या,जे नाव कोणी कधीच घेतलं नाही‌…अरुणाच राहिले.👍पण वाचल्यावर माझ्या कविता आवडू लागल्या,छान लिहितेस ,म्हणून

कौतुक झालं.कोणाच्या वाढदिवसाला,लग्नाच्या,एकसष्ठीला ,लग्नाला २५वर्षे असे प्रासंगिक लेखनही भरपूर केले.

लग्नपत्रिका,दवाखाना,दुकान,शोरूम,वास्तू असेही हौसेने मागतील त्यांना लिहून दिले.

काही कविता तरुण भारत ,सकाळ मधेही प्रकाशित व मासिकांमधेही आल्या‌.

काव्यलेखन व प्रासंगिक लेखन

सुरू असतांना व्हाटसप समुह मिळाले आणि प्रतिभेला चालना मिळून अक्षरश:बहरली कविता!

विविध प्रकारात काव्यलेखन सुरू झालं व भरभराटीला आलं.सात मैत्रिणींनी सप्तधारा हा प्रातिनिधिक संग्रह आ.प्रतिमा इंगोलेंच्या हस्ते प्रकाशित केला.एका,राज्यस्तरीय साहित्य संमेलनात…कवितांचा संग्रह बघून आई बाबा व मलाही खूपच आनंद झाला.

मी कवयित्री झाले होते आता!

त्यानंतर आजपर्यंत खूप साहित्य जमा आहे पण संग्रह काढले नाहीत अजून‌..कविता,मुक्त,लेख,अभंग,अलक,हायकू,काव्यांजली विविध काव्यप्रकार आवडीने हाताळले.फावल्या वेळात हा छंद मनाला दिलासा व निर्मितीचा आनंद देणारा आहे.

मी लिहित असल्याने अनेक साहित्यिकांचं उत्कृष्ट साहित्य वाचायला,अभ्यासायला मिळतं

मैत्रीही जुळते…आता गझलही शिकून लिहीत आहे…हा साहित्यप्रवास कधीच संपू नये असं वाटतं‌.

या वाचन व लेखनाने मला कवयित्री व साहित्यिक म्हणून घडवलं..याचा अभिमान व आनंद वाटतो.!

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

.अरुणा दुद्दलवार,

प्रतिक्रिया व्यक्त करा