You are currently viewing “घर कोणाचे

“घर कोणाचे

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*”घर कोणाचे*

“हे आपलं घर. या गंगाळातलं पाणी पायावर घे आणि आत ये.”
ती मला म्हणाली. तिच्या बोलण्यात आपुलकी आणि आतिथ्य दोन्हीही जाणवलं. वास्तविक आम्ही एकमेकींना ओळखतही नव्हतो. ती माझ्या मावस बहिणीची मैत्रीण. समाज शिक्षणाच्या एका प्रकल्पा निमित्त मी या गावी आले होते. गावात कुणीच ओळखीचं नव्हतं, राहण्यासाठी असं हॉटेलही नव्हतं. पण माझ्या मावस बहिणीने याच गावात राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीच्या घरी,” तू अगदी नि:संकोचचपणे तिच्याकडे रहा. मी तिला कळवते.” असे सांगितल्यामुळे मी इथे आले. तीन चार दिवस माझा मुक्काम असणारच होता.

अनोळखी व्यक्ती, एकत्र कुटुंब, तिचे सासू-सासरे, दीर, जावा— मला दडपण आलंच होतं. पण ती मला बस स्टैंड वर घ्यायला आली होती. बस मधून उतरल्यावर एकमेकींना कसं ओळखायचं या विचारात असतानाच ती समोर आली.
” तू राधिका?”
” हो”
” मी जानकी”
आणि आता ती म्हणत होती “हे आपलं घर”
या तिच्या एका वाक्यानं आम्ही क्षणांत जोडले गेलो आणि परकेपणा फार विरघळून गेला.
तसं घर काही फार मोठं नव्हतं. बाहेरचा व्हरांडा, पुढे छोटसं अंगण आणि बैठकीपासून स्वयंपाकघरापर्यंत डावी उजवीकडे दोन तीन खोल्या. पण का कोण जाणे त्या संपूर्ण घराला आनंदाचा, सहकार्याचा, नाती जपण्याचा, समाधानाचा एक संस्कार असल्याचे जाणवले. त्यांच्या हसतमुख स्वागताने माझं सुरुवातीचं अवघडलेपण कुठेच पळून गेलं.
एक वृद्ध स्त्री, बहुतेक तिची सासू असावी, देवाजवळ पूजा करत होती. त्यांनी तिच्या जावेला हाक मारली,
” सुनंदा यांना पाणी दे जो. सोबत राजगिऱ्याचा लाडू ही देशील बरं कां.”

माझ्या त्या दोन-तीन दिवसांच्या मुक्कामात कोणीही मला *मी पाहुणी* हे जाणवून दिले नाही. जणू काही मी त्यांच्याच परिवारातील होते. *घर कुणाचे* हा प्रश्न तिथे नव्हताच. घर कुणाचचे? घर तुझे, माझे, सर्वांचे! आल्या गेल्यांचे.
एक अनमोल भावना घेऊन जेव्हा मी घरी परतले तेव्हा घर या संज्ञेचा एक महान अर्थ समजला होता.
घर लहान, मोठं, ऐसपैस या विशेषणात ठेवायचं नसतं. दिवसभर काबाडकष्ट करून, थकून भागून येणारा माणूस जेव्हा घरात शिरतो तेव्हा ते त्याचं विश्रांतीचं स्थान असतं. दिवसभरातले समाधानाचे सुख, शांतीचे क्षण याच घरात त्याला मिळतात आणि त्याचा आनंद अतुलनीय असतो. अशा घरात *घर कुणाचे* हा प्रश्नच नसतो. घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते सुख शांतीचे धाम असते. त्या घरात राहणारी प्रत्येक व्यक्ती स्वास्थ्य, स्वातंत्र्य आणि समाधान उपभोगत असते.

” घर काय तुझ्या एकट्याचेच आहे का ?घर माझेही आहे. ते कसं सजवायचं, नटवायचं, तसंच या घरात कुणाला बोलवायचं, कुणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार माझाही आहे.” जेव्हा मी, माझं अशातऱ्हेची वादप्रचुर भाषा त्या घरातल्या भिंतींना ऐकावी लागते तेव्हा त्याही दचकत असतील. कुठेतरी जमिनीत पुरलेला वास्तुपुरुष हळहळत असेल.

” या घरात माझाही हिस्सा आहे. मी इथे राहत नसलो म्हणून काय झालं? इथल्या प्रत्येक वस्तूवर माझाही हक्क आहे कारण हे आपल्या बापाचं घर आहे. याची वाटणी समान झालीच पाहिजे.”

“हे बघ! हे घर माझे आहे. इथले नियम,अटी माझ्या मतानुसार असणार. तुम्हाला पटत नसेल तर खुश्शाल वेगळे व्हा!”

नाहीतर असेही शब्द तणतणतात.”घर काय माझं एकटीचंच आहे. घरातल्या कामाचा वाटा तुम्हीपण उचलायला नको का? घर म्हणजे काय लाॅजींग बोर्डींग आहे का?”

“आहे मनोहर तरी गमते उदास मनी. अशी स्थिती असते माझी या घरात. कारण शेवटी हे घर काही माझे नाही.ते लेक आणि सुनेचे आहे.हे सत्य विसरता येत नाही.”

कायदा आणि भावना या नेहमीच समांतर असतात. कायद्याला भावना नसतात आणि भावनेला कायदा कळत नाही. घर कुणाचे या वादात मात्र ती वास्तू निर्जीव, केवळ दगड मातीची होऊन जाते.

मी एक कथा वाचली होती. त्या कथेतला नायक वडिलोपार्जित घराचे तीन भाग करतो. दोन बहिणींचे आणि एक स्वतःचा. त्यामागे त्याची एकच भावना असते की हे घर फक्त माझे नाही. सासरी सुखात नांदत असलेल्या माझ्या बहिणींचेही आहे. त्यांचा वाटा त्यांना मिळावा. मिळालेल्या भागाचा त्यांनी कसाही वापर करावा. इथे येऊन राहावं किंवा विकूनही टाकावं. बहिणींपुढे भाऊबीजेच्या दिवशी त्याने हा प्रस्ताव मांडला तेव्हा बहिणींनी ताबडतोब ते घर, स्वतःचा हक्क सोडून त्याच्या नावावर केले. म्हणाल्या,” या वास्तूला तू राखतोस. तू घराची काळजी घेतोस. गेले तीस वर्ष कितीतरी खर्च केलास या वास्तुसाठी. ही वास्तू आमचं माहेर आहे आणि आमच्यासाठी तू तेच टिकवून ठेव. यातच आम्हाला आनंद आहे.हीच आमची भाऊबीजेच्या निमीत्ताने परत भेट.”

त्यावेळी खरोखरच असे वाटते

*घर असावे घरासारखे*
*नकोत नुसत्या भिंती*
*इथे असावा प्रेम जिव्हाळा*
*नकोत नुसती नाती* ।।

अशा घरात घर कुणाचे हा प्रश्नच उद्भवत नाही. असे घर सर्वांचे असते, सर्वांसाठी असते.

*राधिका भांडारकर पुणे*.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा