You are currently viewing मालवणात उद्या २७ ऑगस्टला नारळ लढविणे स्पर्धा
Oplus_16908288

मालवणात उद्या २७ ऑगस्टला नारळ लढविणे स्पर्धा

रॉयल ब्रदर्स मित्रमंडळ आयोजित, सतीश आचरेकर पुरस्कृत

मालवण :

रॉयल ब्रदर्स मित्रमंडळ आयोजित व सतीश आचरेकर पुरस्कृत नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून नारळ लढविणे स्पर्धा गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी मालवण बंदर जेटी येथे दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ११ हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये व चषक, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी २ हजार २०० रुपये व आकर्षक चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धा एकूण आठ गटांमध्ये खेळविण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांना मंडळाच्या वतीने ५ नारळ दिले जाणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश शुल्क २५० रुपये असून इच्छुक स्पर्धकांनी आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धकांनी नावनोंदणीसाठी आनंद आचरेकर – ९३२५२०१३७५, हर्ष मिठबावकर – ७७०९१०२५७२ आणि कुलराज बांदेकर – ९३०९८१३०६१ यांच्याशी संपर्क साधावा.

नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या आगळ्या-वेगळ्या नारळ लढविणे स्पर्धेला स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा