You are currently viewing गुळाची करंजी

गुळाची करंजी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ संध्या कुलकर्णी यांची स्वादिष्ट पाककृती*

 

*गुळाची करंजी*

 

*साहित्य*……

३वाटी मैदा, १ वाटी बारीक रवा , २ चमचे तुप ,२ छोटे च साखर, थोडेच मीठ

 

*कृती*…… वरील सगळे मळुन २ तास ठेवा.

*सारण*….. २ वाटी सुके खोबरे तुकडे करून भाजून घेणे, २ वाटी बारीक केलेला गुळ, १/२ वाटी डाळं थोडे भाजून घेणे, वेलची व जायफळ पूड, भाजलेले खसखस, हवे असल्यास काजू बदाम पुड ही थोडे परतून घेणे. हे सर्व मिक्सरमध्ये जरा भरडच काढणे.आधी डाळं बारीक करुन घ्यावे.नंतर खोबरे बारीक करुन त्यातच गुळ घालून भरड काढून घेणे.

नंतर नेहमी प्रमाणे करंजी करून तळून घेणे.

(खुप मस्त करंजी होतात)..

*ज्यांना साखर खायची नाही त्यांच्यासाठी ह्या गुळाच्या करंज्या चवीला एकदम उत्तम होतात*…😋😋

प्रतिक्रिया व्यक्त करा